logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
पीळ
जुलै 22, 2016
नशीबवान
ऑक्टोबर 21, 2016
दृष्टी
सप्टेंबर 16, 2016
अज्ञानी समाजात एखाद्या व्यक्तीला ज्ञानप्राप्ती होते आणि मग ही व्यक्ती अज्ञानाचा अंधःकार दूर कसा करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करू लागते. अशा व्यक्तीबाबत सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया दोन टोकांच्या असतात. एक तर समाज त्या व्यक्तीला वेडं ठरवतो किंवा देवत्व देतो. दोन्ही बाबतीत त्या व्यक्तीचे विचार समजून घेण्याची जबाबदारी मग समाजाची राहत नाही. मग हा समाज माणसांचा असो नाहीतर मुंग्यांचा . . .

ओसाड होती जागा तिथे होते एक वारूळ
शिरले होते त्या मुंग्यांच्या डोक्यात एक खूळ
वारूळाच्या बाहेर नजरेस लाल गोळा पडे
हलत होता परत परत उजवी डावीकडे

एकाच रेषेत दिसू शकायची त्यांना सारी सॄष्टी
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || १ ||

त्या गोळ्याच्या गतीमागचे कारण नव्हते स्पष्ट
अर्थ लावण्या जमा जाहल्या पाच मुंग्या शिष्ट
विचार करूनही उत्तर शोधणे नाही त्यांना जमले
त्यांनी मग ह्मा विषयावरती अभ्यासमंडळ नेमले

उत्तर शोधल्यावरच त्यांची होणार होती तुष्टी
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || २ ||

उत्तर काही सापडत नव्हते बांधले जरी कयास
वेगवेगळ्या घटनांचा त्यांनी केला मग अभ्यास
वारूळातील मुंग्यांना केले त्यांनी सवाल
जबाब सारे गोळा करूनी सज्ज होर्इ अहवाल

पडतो कधी दुष्काळ आणखी होते कधी वॄष्टी
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || ३ ||

हलणारा तो गोळा म्हणजे आहे एक शक्ती
होर्इल तुमचे भले तयाची कराल जर का भक्ती
घटना घडती मंगल जेव्हा गोळा उजवीकडे
घटना घडती वार्इट जेव्हा जातो डावीकडे

वैयक्तिक घटनांनी देती अहवालाला पुष्टी
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || ४ ||

अर्चा करू लागले सर्वजण जोडून आपले हात
प्रार्थनास्थळे बनली त्या गोळ्याची वारूळात
गोळा उजवीकडे साजरे होऊ लागले सण
गोळा डावीकडे घाबरून जाती सारेजण

गोळ्याची पाहून स्थिती ते आनंदी अन् कष्टी
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || ५ ||

एका मुंगीने मग केली अशी तपस्या भव्य
चमत्कार घडला अन् दॄष्टी प्राप्त जाहली दिव्य
वर्तुळाकार फिरत असे तो गोळा केंद्राभवती
उजवी किंवा डावी ऐसी स्थितीच त्याला नव्हती

त्या मुंगीला प्राप्त जाहली तेथ द्वीमितीय दॄष्टी
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || ६ ||

गोळ्याबद्दल त्या मुंगीने विचार केला खोल
कळून चुकली अवडंबर ते होते कैसे फोल
अज्ञानातून प्रत्येकाला बाहेर काढण्यास
त्या मुंगीने आयुष्याचा एक घेतला ध्यास

उजवी डावी त्या गोळ्याची स्थिती सापेक्ष नुसती
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || ७ ||

ज्ञानी मुंगी बाकीच्यांना सांगे समजावून
वेडी ठरवून मुंग्या गेल्या तिच्यावरी धावून
अज्ञानी ह्मा मुंग्या करती आपुला आपणच नाश
सांगून सांगून थकली अंती झाली ती निराश

धर्मद्रोही ठरवून सुनवती चार तिला अन् गोष्टी
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || ८ ||

घोर अज्ञान तेथील पाहत राहिली झुरून झुरून
एकांतातच दु:खाने त्या गेली ती मरून
मृत्यूनंतर मात्र अचानक दिवस असे ते फिरले
मुंगीचे त्या महात्म्य सगळ्या डोक्यांमध्ये शिरले

नक्की काय म्हणत होती ती एकमेकांस पुसती
मुंग्यांच्या त्या समुहा होती एकमितीय दॄष्टी || ९ ||

प्रार्थनास्थळी गोळ्याच्या त्या आता जर का जाल
मुंगीचीही विशाल मूर्ती हटकून तिथे पाहाल
आयुष्यभर ज्या गोळ्यावरती करत राहिली टीका
त्याशेजारी स्थान मिळाले मोठी शोकांतिका

गोळ्यासंगे नाव तिचेही प्रत्येकाच्या औष्ठी
मुंग्यांना त्या अजूनही आहे एकमितीयच दॄष्टी || १० ||

शेअर करा
33

आणखी असेच काही...

मार्च 13, 2023

प्राक्तन


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • मोकळा वेळ मार्च 26, 2023
  • प्राक्तन मार्च 13, 2023
  • प्रेमाचा पाढा फेब्रुवारी 14, 2023

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो