logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
बिस्किटाचा पुडा
फेब्रुवारी 4, 2011
शिकवण
मार्च 18, 2011
आई
फेब्रुवारी 18, 2011
८ मार्च हा ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून पाळला जाणार आहे. आपल्या आयुष्यात येणारी पहिली महिला म्हणजे आपली आई. आईच्या आपल्या अपत्यावर असलेल्या निस्सीम, निर्भेळ, निर्व्याज प्रेमाला कशाचीही उपमा देता येणार नाही. पण आपण आपल्या आईच्या प्रेमाला तितकाच उत्कट प्रतिसाद देतो का? सादर आहे काव्यकथा ‘आई’.

आटपाट गाव होतं घरं होती सोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा || धृ ||

घर आणि शाळा सोडून
जगच मजला नव्हतं
घरात आम्ही दोघंच आणि
तिसरं कुणीही नव्हतं
किती होती कुरूप तिजला
नव्हता हो अंदाज
एकमेव त्या डोळ्‍याची पण
मलाच वाटे लाज

तिला बोलणं घालून पाडून हाच माझा चाळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा || १ ||

अशीच एकदा आई माझ्या
शाळेमध्ये आली
पाहून तिजला अंगाची ह्या
जणू काहिली झाली
इथे कशाला आलीस मित्र
हसतील तुजला बघून
डोळ्‍या पाणी तरारे तिच्या
गेली तेथून निघून

वदलो तिजला आलीस जर का सोडून देईन शाळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा || २ ||

शाळेत असतानाच ठरवलं
दूर निघून जायचं
परतून परतून मला तिचं ते
तोंड नव्हतं पाह्यचं
थोडा मोठा झाल्यावर मी
सोडून गेलो गाव
आयुष्यात नंतर कधीही
काढलं नाही नाव

कष्ट केले मोठा झालो जमवून तोळा तोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा || ३ ||

एकदा माझ्या दारी आली
जर्जर एक बाई
चेहरा पाहताच कळलं ती तर
होती माझी आई
घाबरेल माझा मुलगा म्हणूनी
घेतलं नाही घरात
हात जोडतो निघून जा
दार लावलं जोरात

म्हटलं माझ्या आयुष्यात हा कलंक एकच काळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा || ४ ||

वर्षं सरली डोळ्‌यांचे एक
डॉक्टर भेटले मला
ओळखतो मी डोळे तुमचे
बघून बोलले मला
लहानपणीच्या अपघाताने
डोळा तुमचा गेला
आई तुमची थोर स्वत:चा
डोळा देऊ केला

ऐकून त्यांचे बोल मन झालं चोळामोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा || ५ ||

आग पेटली मनात माझ्या
माझीच वाटे लाज
तिच्या पाऊली लोळण घेऊन
माफी मागीन आज
शेजारी त्या बंद घराचे
भेटायाला आले
कालच गेले प्राण विलंब
केला मला म्हणाले

तुझ्याच वाटेकडे लावूनी बसली होती डोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा || ६ ||

दोन डोळे असुनी करंटा
होतो मी तर अंध
सुंदर असतं मन ह्याचा
नव्हता मजला गंध
सुन्न मनाने परतुनी आलो
बंगल्याच्या मी दारी
स्वामी तिन्ही जगाचा होतो
आईविना भिकारी

डोळ्‌यापेक्षा प्रिय होता तिजला पोटचा गोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा ।। ७ ।।

आटपाट गाव होतं घरं होती सोळा
गावात माझी आई तिजला होता एकच डोळा ।। धृ ।।

काही अभिप्राय

  • नीलिमा मोडक प्रभू
    अप्रतिम! सुंदर! Speechless झाले.
    नीलिमा मोडक प्रभू
    ०४.०३.२०११
शेअर करा
64

आणखी असेच काही...

नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
जानेवारी 3, 2022

विद्ध


पुढे वाचा...
मे 30, 2021

रोप


पुढे वाचा...

2 Comments

  1. विशाल शिंदे म्हणतो आहे:
    मे 11, 2020 येथे 6:57 AM

    अप्रतिम

    उत्तर
    • संदीप दांडेकर म्हणतो आहे:
      मे 15, 2020 येथे 3:17 PM

      मनःपूर्वक धन्यवाद विशाल..

      उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो