logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
ती भेटली परंतु ..
फेब्रुवारी 14, 2021
रोप
मे 30, 2021
कवीराज
मार्च 21, 2021
आज आंतरराष्ट्रीय कविता दिन आहे. बरेचदा असं होतं की मित्र-मैत्रिणींचा एक छान समूह असतो. सगळं अगदी मजेत चाललेलं असतं आणि अचानक एक दिवस त्या समूहावर संकटाचा डोंगर कोसळतो. त्या समूहातील एका व्यक्तीला कविता होते. म्हणजे अगदी एखाद्याला सर्दी होते किंवा कावीळ होते ना, तशी कविता होते. दुर्दैवाने त्या असाध्य रोगाच्या परिणामांची जराही कल्पना त्या रोगी व्यक्तीला नसते. भोगतात ते बिचारे त्या समूहातील इतर जण …

ही कविता यूट्यूबवर https://youtu.be/Pp-ZLpZqC9k ह्या ठिकाणी ऐकता येईल.

कवीराज ते आले आले झाली पळापळ
आप्तमित्र अन् सवंगड्यांच्या छातीत आली कळ ॥

काही लपले खुर्चीखाली टेबलखाली काही
बाथरूममध्ये गेला जो तो बाहेर आला नाही
कवीराज ते आले आले झाली पळापळ
खिडकीतूनच सूर मारती होते जे चपळ ॥

उरले होते त्यांना वाटे रडू या काढून गळे
तरीही कवीला पाहून हसती सारेच बळेबळे
कवीराज ते आले आले झाली पळापळ
केविलवाणे भाव जैसी शिक्षा आता अटळ ॥

कविराजांना दहशतीचा ह्या अपुल्या नव्हता पत्ता
वहीच काढली त्यांनी गाली अपुल्या हसता हसता
कवीराज ते आले आले झाली पळापळ
नव्हती वही ती हत्यारच ते करण्याकरता छळ ॥

अप्रतिम ते काव्य सुचे मज ऐकवितो तुम्हाला
बोल ऐकुनी वाटे कानी कुणी खुपसला भाला
कवीराज ते आले आले झाली पळापळ
सज्ज जाहले असे प्राक्तनी लिहिले भोग अटळ ॥

कविराजांच्या मुखामधुनी मग ब्रह्मांडच साकारे
सूर्याच्या भाकरीस तोंडी लावायाला तारे
कवीराज ते आले आले झाली पळापळ
प्रतिकारासाठीही कुणाला उरले नाही बळ ॥

गेल्या घटका पळे तास अन् कितीक गेले प्रहर
शब्दांच्या भडिमाराने त्या ऐसा माजे कहर
कवीराज ते आले आले झाली पळापळ
बधीर मेंदूला समजत नाही वेळ काळ अन् स्थळ ॥

प्रफुल्लीत कवीराज निघाले जराही नाही थकवा
इथे मात्र कुणी शुद्ध हरपली कुणास मारे लकवा
कवीराज ते आले आले झाली पळापळ
खोली झाली उद्ध्वस्त जशी धडकावी वावटळ ॥

कवीराज ते आले आले झाली पळापळ
आप्तमित्र अन् सवंगड्यांच्या छातीत आली कळ ॥

शेअर करा
8

आणखी असेच काही...

डिसेंबर 18, 2022

… अडलं नाही बुवा


पुढे वाचा...
नोव्हेंबर 25, 2022

छेड


पुढे वाचा...
मे 23, 2022

देव


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो