logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
सैनिक
डिसेंबर 15, 2011
ती
फेब्रुवारी 4, 2011
एखादी व्यक्ती दुःखी आहे ह्या कल्पनेवर आपला फार पटकन विश्वास बसतो. मग ती व्यक्ती आपल्या जवळच्या नात्यातील असो नाहीतर केवळ कधीतरी ओझरती पाहिलेली असो. अर्थातच ह्या कल्पनेत नेहेमी तथ्य असतंच असं नव्हे …

मी रस्त्यावरती
अन् खिडकीमध्ये ती
दिसली ओझरती
पण मनी अल्हाद झाला || १ ||

मोकळे होते केश
साधा घरचा वेष
ठाऊक नाही शेष
पण चेहरा आपला वाटला || २ ||

केसामध्ये फुल
किंचित होती स्थूल
कमरेवरती मुल
खेळवत होती त्याला || ३ ||

आनंदाची भरती
सुंदर चेहेऱ्यावरती
सुखाचीच ती मुर्ती
हास्य जणु मधुबाला || ४ ||

रोजचा बसचा रस्ता
खिडकीशी मी बसता
तेथे आलो असता
रोज दिसे ती मजला || ५ ||

ओळख माझी नाही
तशी शक्यता नाही
तरीही जेव्हा पाही
बरं वाटे मनाला || ६ ||

बाकी दिवसभर
कामाचा डोंगर
पण दिसे जेव्हा घर
वाटे हवी दिसायला || ७ ||

एकदा दिसली ती
शेजारी पती
आडदांड जणू यती
जसा कातळ काळा || ८ ||

तिचा चेहरा खास
होता का उदास
आला नाही रास
वार्इट वाटे मजला || ९ ||

पतीच असेल तर
होता वयस्कर
ती एवढी सुंदर
कसा मिळाला तिला || १० ||

दिवसभर विचार
केला मग मी फार
तिच्या नशिबी भार
आला असा कशाला || ११ ||

दुसऱ्या दिशी परत
जेव्हा होतो बघत
होती सुंदर हसत
आपल्याशीच ती बाला || १२ ||

दिसत होती सुखी
नव्हती कधी जणू दु:खी
अनोळखी ती सखी
हर्ष परतून आला || १३ ||

ताबा ना मनावर
राग असे जगावर
दुसऱ्याच्या दु:खावर
विश्वास बसतो आपला || १४ ||

कालचक्र ते सरते
अंधुक आठवण उरते
आजही पण ती स्मरते
हर्ष देते मनाला || १५ ||

अजून आहे आठवण
देऊन गेली शिकवण
आनंदाची साठवण
नियम नाहीत त्याला || १६ ||

शेअर करा
2

आणखी असेच काही...

मार्च 8, 2022

पुरुषप्रश्न


पुढे वाचा...
ऑगस्ट 1, 2021

जेवण


पुढे वाचा...
मार्च 21, 2021

कवीराज


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो