logo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_taglinelogo_with_tagline
  • मुखपृष्ठ
  • मनोगत
  • कविता
    • भारत रत्न
    • सणावली
    • विचार
    • काव्यकथा
    • प्रेमकाव्य
    • बालकाव्य
    • वस्तुवाचक
    • व्यक्तिवाचक
    • स्थलवाचक
    • विज्ञान / तत्वज्ञान
    • भक्तिकाव्य
    • चारोळया
  • लेख
    • लघुकथा
    • लघुलेख
  • पुस्तके
  • अभिप्राय
  • संपर्क
जीवाचं मोल
फेब्रुवारी 7, 2014
उडदामाजी काळे गोरे
एप्रिल 18, 2014
प्रेमाचा धंदा
फेब्रुवारी 21, 2014
कोणत्याही धंद्यात यशस्वी होण्यापूर्वी नुकसान सहन करण्याची तयारी आणि ताकद ठेवावी लागते. अगदी प्रेमाचा धंदाही ह्याकरता अपवाद नाही . . .

कमावायला जाल दोन बसाल गमावून चार
प्रेमाच्या ह्मा धंद्यामध्ये नुकसानच फार || धृ  ||

बालपण सारं खर्चून तारूण्य मी कमावलं
तारूण्याचं भांडवल धंद्यामध्ये मी लावलं
शरीराच्या ह्मा कारखान्यात यंत्र म्हणून मन
दिवसरात्र प्रेमाचंच मग केलं उत्पादन
तडजोड म्हणून केली नाही कधी गुणवत्तेशी
वस्तू बघा तयार झाली एकदम बावनकशी
नातीगोती पाहिली नाहीत नाही अन् घरदार
प्रेमाच्या ह्मा धंद्यामध्ये नुकसानच फार || १ ||

इतकं प्रेम तयार केलं मोठा झाला साठा
विकण्यासाठी मोकळ्या होत्या मला चारी वाटा
ग्राहक कुठून येर्इल ह्माचा नव्हता काही नेम
किंमत माझ्या प्रेमाचीही होती फक्त प्रेम
जिथे तिथे ग्राहक होते एक नाही सतरा
वस्तू माझी विकण्यासाठी सुरू झाल्या चकरा
महिना नाही पाहिला नाही तारीख नाही वार
प्रेमाच्या ह्मा धंद्यामध्ये नुकसानच फार || २ ||

ग्राहक शोधता शोधता माझा जीव झाला अर्धा
कळलं धंद्यामध्ये ह्मा तर भलतीच आहे स्पर्धा
धूर्त मोठे ग्राहक होते सारे बाजारात
निरखून पारखून एक घेती वस्तू हजारात
स्पर्धकांच्या प्रेमासंगे आकर्षक योजना
सवलत सूट घर गाडी काय वाटेल ते म्हणा
सुलभ हप्ते घेण्यासाठीसुद्धा कुणी तयार
प्रेमाच्या ह्मा धंद्यामध्ये नुकसानच फार || ३ ||

किती ग्राहक येऊन गेले दुकानाच्या आत
पण ओळख होण्यापुढे कधी गेलीच नाही बात
एक हसली वाटलं आता नक्की होणार सौदा
नंतर कळलं तिच्याकरता माझा नंबर चौदा
किंमत हवी चोख बाकी नव्हतो चोखंदळ
नक्की येर्इल ग्राहक म्हणत काढत बसलो कळ
ग्राहकांना हवंय काय ते कसं समजणार
प्रेमाच्या ह्मा धंद्यामध्ये नुकसानच फार || ४ ||

आतबट्ट्याच्या धंद्याचं ह्मा व्हायचं तेच झालं
तारूण्याचं भांडवल माझं पार संपत आलं
वडील म्हणाले धंदा करणं आपलं नाही काम
नोकरपेशी माणसं आपण त्यातच आपला राम
पहिलं स्थळ स्वीकारलं दाबून मनाचे धुमारे
संसाराची चाकरी करतोय र्इमाने इतबारे
मनात सारखा येतो नवीन धंद्याचा विचार
पण प्रेमाच्या ह्मा धंद्यामध्ये नुकसानच फार || ५ ||

कमावायला जाल दोन बसाल गमावून चार
प्रेमाच्या ह्मा धंद्यामध्ये नुकसानच फार || धृ ||

शेअर करा
50

आणखी असेच काही...

जानेवारी 20, 2022

चांगलं तेवढं घ्यावं


पुढे वाचा...
डिसेंबर 19, 2021

थोडं आणखीन ..


पुढे वाचा...
डिसेंबर 1, 2021

देव बसला वर ..


पुढे वाचा...

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

नविनतम लेखन

  • … अडलं नाही बुवा डिसेंबर 18, 2022
  • छेड नोव्हेंबर 25, 2022
  • देव मे 23, 2022

ताज्या प्रतिक्रिया

  • मे १५, २०२०

    संदीप दांडेकर commented on आई

  • मे ११, २०२०

    विशाल शिंदे commented on आई

टॅग्स

काव्यकथा काव्यगाथा प्रेमकाव्य बालकाव्य भक्तिकाव्य भारत रत्न रामायण लघुकथा लघुकथासंग्रह वस्तुवाचक वैचारिक कविता वैज्ञानिक / तात्वज्ञानिक कविता व्यक्तिवाचक कविता सणावली सामाजिक कादंबरी स्थलवाचक कविता
© २०१८-२१, नवनिर्मिती | संकेतस्थळ श्रेय - वेब वर्चुओसो