कविता

भक्तिकाव्य

जेव्हा योग्य रितीने कर्म करूनही अपेक्षित फळ मिळत नाही तेव्हा हळवं झालेलं मन एक अशी शक्ती शोधू लागतं जिच्यावर भरवसा ठेवून आयुष्यातील मनस्ताप कमी होतील. लहान बालकांचा ज्याप्रमाणे आपल्या आई-वडिलांवर पूर्ण विश्वास असतो त्याचप्रमाणे ‘देवाला काळजी’ म्हटलं की आपण आयुष्य निर्धोकपणे जगायला मोकळे होतो.

फेब्रुवारी ६, २०१५

हरीचरण शरण

अनेकदा टॅक्सी, रिक्षा, गाड्यांच्या मागे 'देवाक् काळजी' असं लिहिलेलं असतं. देवावर एकदा सारा भार सोपवला की मनःशांतीची द्वारं खुली होत असतील. शंका, चिंता किंवा विघ्न अशा कोणत्याही प्रसंगात आपलं ओझं वाहणारी एक समर्थ शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे हा दिलासा माणूस नेहमीच मनात जपत आलेला आहे . . . 

ठेवू नकोस किंतु
मोही नकोस गुंतू
वाहून सर्व तंतू
   हरीचरण शरण जावे

दिवसाही आणि राती
ऋतू सर्व येत जाती
विसरून समयनाती
   हरीचरण शरण जावे
जुलै १८, २०१४

देव असावा कसा

'देव कुणाला म्हणावे अथवा म्हणू नये' असा एक नवीनच वाद सध्या सुरु आहे. मला इतके दिवस वाटत होतं की देव हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. एखादी गोष्ट देव आहे किंवा नाही हे ठरवणारी एखादी संस्था आहे हेच मला ठाऊक नव्हतं. आमच्या office मध्ये दसऱ्याला phone आणि संगणकांचीही पूजा होते. त्याकरता परवानगी घेतली आहे का हे तपासलं पाहिजे . . .
 
. . . 

देव असावा असा
   सकाळची न्याहारी
दिनभरच्या कामाची
   मिळेल उर्जा सारी

देव असावा असा
   जशी वाट ती लांब
मार्गी त्या लागता
   कुणी न म्हणते थांब

देव असावा असा
   आसमंत ते निळे
जगी कुठेही जावे
   त्याचे छप्पर मिळे

. . .